गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (08:37 IST)

माधुरी दीक्षित बनली मराठी सिनेमाची निर्माती

माधुरी दीक्षित- नेने लवकरच एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. योगेश विनायक जोशी याच्या लेखणीतून उतरलेल्या कथेला स्वप्नील जयकर दिग्दर्शित करणार आहे. ‘आरएनएम मुव्हींग पिक्चर्स प्रा. लि.’ या बॅनरअंतर्गत माधुरी सिनेमाची निर्मिती करणार आहे. या सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही. या वर्षअखेरीस या सिनेमाच्या चित्रीकरणास सुरूवात करण्याचा टीमचा मानस आहे. तसेच नितीन वैद्य या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असतील. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होईल.