शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (16:40 IST)

अर्जुन रामपालच्या डॅडी मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे

मराठी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये जम बसवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पडून हिंदी सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. राजेश शृंगापुरे हे मराठी सिनेजगतातलं नावाजलेलं नाव आपल्याला आता बॉलिवूडमध्येही पाहायला मिळणार आहे. अर्जुन रामपाल याचा बहुचर्चित 'डॅडी' या सिनेमात राजेश महत्वाची भूमिका साकारणार आहे. 
 
'स्वराज्य', 'संघर्ष' यांसारख्या अनेक मराठी सिनेमात राजेश अनेक चांगल्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. 'झेंडा' या सिनेमातल्या त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खुप कौतुक केले. राजेश शृंगारपूरे आपल्याला कायम धडाकेबाज भूमिका साकारताना दिसले.  राजेश यांनी मराठीसोबतच 'सरकार राज', 'मर्डर थ्री' या हिंदी सिनेमात देखील कामे केली.  मराठी तसेच हिंदी सिनेमा असो किंवा छोटा पडदा असो ही दोन्ही माध्यमे गाजवलेल्या राजेश यांनी दोन हॉलिवूड सिनेमातही काम केले आहे. त्याच्या या सिनेमातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. 'डॅडी' या सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी त्याने मौन राखणेच पसंत केले. 'अरुण गवळी' यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॅडी या सिनेमात राजेश शृंगारपुरे एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.