शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (12:38 IST)

दीपिकाला 'त्याच्या' नावाचा टॅटू नको?

बॉलिवूडध्ये जोड्या बनतात, तुटतात हे तसं फार नवीन राहिलेलं नाही. पण दीपिका आणि रणबीर कपूरची कहाणी थोडी निराळी आहे. ते दोघं अगदी प्रेमात आकंठ बुडाले होते, अशी माहिती मिळते आणि त्यामुळेच दीपिकानं त्याचं टॅटू आपल्या मानेवर गोंदलं होतं. मात्र ताज्या फोटोंमध्ये टॅटूच्या जागेवर बँडेज लावण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामुळे रणबीर कपूरसाठी काढलेलं हे टॅटू दीपिका आता हटवू इच्छिते असं बोललं जात आहे. मीडियातून प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार दीपिकाला एका चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाली. तिची मान यावेळी दुखावली गेली, असे सांगण्यात आलं. मात्र 'नेक इंज्युरी'च्या बहाण्यानं दीपिका आपल्या शरीरावर असलेले रणबीरची आठवण देणारे टॅटू हटवू पाहात आहे. दीपिका आणि रणवीर सिंह हे सध्या अगदी जवळ आले असून विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनाएकत्र पाहिलं गेलं आहे. पडद्या बाहेरही त्यांच्यातील केमेस्ट्रीची चर्चा होत राहते. म्हणूनच दीपिका हे टॅटू हटवू पाहते आहे, अशी चर्चा आहे. दीपिका टॅटू हटवणार अशा अनेक बातम्या या आधीदेखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र दीपिकानं त्या सगळ्या अफवा ठरवत टॅटू तसचं ठेवलं होतं.