1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नागराज मंजुळे यांचा सूंदर लेख : अचानक तोल गेला

whats app message
माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
अचानक तोल गेला,
कप सांभाळत पडल्यामुळे,
हाताच्या कोपराला लागले.
कपही फुटला.
जर मी कप सोडला असता,
तर लागले नसते.
आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.
शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.
मला विचारलच नाही;
मला Good morning केले नाही;
मला निमंत्रणच दिलं नाही;
माझं नावंच घेतलं नाही;
माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;
माझा फोन घेतला नाहीं ;
मला बसायला खुर्चीच दिली नाही;
मला मानच दिला नाही.
सोडुन द्या हो!
सोडायला शिकलं कि मग पहा,
निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.  तो सोडता आला कि झालं.
तो लगेच सोडता येणार नाही.  पण कठिणही नाही.  प्रयत्न करायला काय हरकत आहे.