रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2018 (15:02 IST)

प्रवीण तोगडिया यांना पत्रकार परिषदेत रडू कोसळले

अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

यावेळी मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी केला.

एक माणूस अचानक माझ्या घरात घुसला. त्याने मला सांगितलं की तुमचा एन्काउंटर होणार आहे. आयबीच्या माध्यमातून मला घाबरवलं जात आहे. इतकं असूनही मी काल पोलिसांना सोडून रिक्षातून निघालो होतो. लोकेशन कळू नये म्हणून मी फोन स्वीच ऑफ केला होता. जयपूरला विमान पकडण्यासाठी निघालो होतो, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाटेतच बेशुद्ध पडलो, पुढचं काही आठवत नाही, असं तोगडियांनी सांगितलं.