मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इतिहासात पहिल्यांदाच न्यायमूर्तींची पत्रकार परिषद

काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाहीये, मागील दोन महिन्यांपासून कोर्टाचं कामकाज अव्यवस्थित, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची पत्रकार परिषद.
 
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आहेत. न्यायमूर्ती चेलमश्वरांसह ४ न्यायमूर्तींची परिषद घेतली आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज निष्पक्षरित्या होत नसल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. 
 
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 
न्यायालयाची स्वातंत्रता लोकशाहीत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
सुप्रीम कोर्टाच कामकाज योग्य पद्धतीन होत नाही.
 
मुख्य न्यायाधिशांची भेट घेऊन प्रश्न मांडले पण उपयोग न झाल्याने जनतेसमोर आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
 
यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा गोष्टी घडल्या नाहीत.
 
मागील दोन महिने कोर्टाच कामकाज अव्यस्थित 
 
चीफ जस्टिसना दिलेले पत्र सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.