मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (16:48 IST)

तिकडे नाना सोबत अक्षय तर तनुश्रीला ट्विंकलचा पाठींबा, नाना तनुश्री वाद

अनेक वर्षपासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या जोरदार चर्चेत आहे. नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्तानं 2008 सालू 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शोषणाचा आरोप केला असून हा वाद चांगलाच पेटला आहे. एका मुलाखतीत तीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करत 'जर अक्षय कुमार आणि रजनीकांतसारखे मोठे अभिनेतेही त्याच्यासोबत काम करतात तर मग इथं बदलाची काय अपेक्षा ठेवता येईल?' असा प्रश्नही तनुश्रीनं उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमार आपल्या नव्या सिनेमासाठी 'हाऊसफुल 4'साठी नाना पाटेकरसोबत काम करत आहे. मात्र अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना तनुश्रीला पाठिंबा देत पुढे आली आहे. 10 वर्षांपूर्वी तनुश्रीला इंडस्ट्रीतून कोणताही पाठिंबा मिलाला नव्हता. परंतु, तनुश्रीच्या नुकत्याच झालेल्या वादग्रस्त मुलाखतीनंतर अनेक जण तिचं सोशल मीडियातून समर्थन करताना दिसत असून, सोशल मिडीयावर वाद वाढला आहे. याच दरम्यान एका महिला पत्रकारानं त्यावेळी आपण सेटवर उपस्थित असल्याचं सांगत तनुश्रीचा शब्द आणि शब्द खरा असल्याचं म्हटल आहे. त्यामुळे हा वाद प्रसिद्धी साठी आहे की इतर दुसरे करण आहे. हे वेळच ठरवणार आहे.