रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (11:36 IST)

'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' या सनीच्या रिमिक्स लावणीने गतवर्षीच्या बॉईजला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती. त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या 'बॉईज २' मध्ये आयटम सॉंग नसेल तर नवलच ! अवधूत गुप्तेचे भन्नाट संगीतदिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'तोडफोड' हे आयटम सॉंग तरुणांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे. 'बॉईज २' चा संवाद लेखक ह्रीशिकेश कोळीने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे, गणेश चंदनशिव आणि प्रसेनजीत कोसंबीचा आवाज लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात प्रसिध्द कलाकार गिरीश कुलकर्णी यांचा हटके अंदाज आपल्याला पाहता येणार आहे. वाढदिवसावर आधारित असलेल्या या 'तोडफोड' सॉंगमध्ये सुवर्णा काळेचा आयटम नंबर आपल्याला पाहायला मिळतो. उडत्या लयीचे हे गाणे तरुणाईला आपल्या तालावर थिरकवण्यास यशस्वी ठरत आहे.
 
शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी सांभाळली आहे. शिवाय,  इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे.