गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (15:20 IST)

सोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे  भायटम सॉंग नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहे. याला नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.
 
आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात न शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. प्रणीत कुलकर्णी यांनी हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे. हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडणारा व वास्तववादी स्थिती मांडणारा आहे.