बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (09:14 IST)

पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल

अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे अतिशय कमी वेळात व्हायरल झाले आहे. ‘दिमाग मे भूसा’असे या गाण्याचे बोल असून ते पिळगावकर यांनी गायले आहे. या गाण्यावरुन नेटीझन्सनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. तुमच्याकडून अशापद्धतीचे वागणे अपेक्षित नाही असे अनेकांचे म्हणणे होते. आताही त्यांना त्याच पद्धतीने ट्रोल करण्यात येत आहे. 
 
या ‘दिमाग मे भूसा’या गाण्यातील शब्दही अतिशय सुमार दर्जाचे असून ते पिळगांवकर यांच्यासारख्या कलाकाराने गावे का असे काहींचे म्हणणे आहे. युट्यूबवर हे गाणे अपलोड झाल्यापासून असंख्य लोकांनी पिळगांवकर यांना खडे बोल सुनावले आहेत. हे गाणेही शेमारु कंपनीचे असून रफीक राजा आणि झाहूर अलम यांनी त्याला संगीत दिले आहे. मुंबई अँथमप्रमाणे हे गाणेही मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.