शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कतरिना कैफ बाई आरती करताना असे ओवाळतात का ? झाली कतरिना ट्रोल

नेटकरी कधी कोणाला डोक्यावर घेतील, कधी कोणाला खाली पडतील याचा काही अंदाज नाही. आता हाच फटका कतरिना कैफ या अभिनेत्रीला बसला आहे. तेही गणपती आरती करते वेळी चुकीच्या दिशेने पूजा करताना ओवाळताना दिसली, मग काय, नेटकरी झाले सुरु. ढोल ताशांच्या गजरात, गणरायाचे सर्वत्र आगमन झाले. त्याबरोबर बॉलिवूड दबंग सलमान खान याची लहान बहीण अर्पिता खान हिच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले होते.
 
यावेळी सलमानची बहिण म्हणून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अर्पिताच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अर्पिताचे कुटुंबीय आणि काही खास मित्र मैत्रिणी गणरायाची आरती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओवरून अभिनेत्री कतरिना कैफ हिला नेटकऱ्यांनी जोरदार सुनावले आहे. कतरिना ही गणरायाची आरती करताना गणरायाला जगावेगळ्या पद्धतीने ओळताना समोर आली आहे. सलमानची मोठी बहिण अलविरा खान हिचा नवरा व अभिनेता अतुल अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर सहज हा व्हिडीओ शेअर केला होता. नेहमीच आरती ओवाळताना डावीकडून उजवीकडे ओवाळली जाते असे आहेच, मात्र या व्हिडीओत कतरिना आरती ओवाळताना उजवीकडून डावीकडे ओवाळताना दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तिला अनेकांनी सुनावले आहे की आरती आणि पूजा तरी ठावूक आहे का ? जमत नसेल तर असे करू नये, तू कधी कोणाला ओवाळले आहे का ?