बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जुलै 2018 (12:18 IST)

तर बॉलिवूडध्ये आलीच नसती कॅटरिना

सिंग इज किंग, वेलकम, एक था टायगर, जब तक है जान, अगदी अलीकडचा टायगर जिंदा है यासारखे अनेक हिट चित्रपट देणारी ग्लॅम डॉल म्हणजेच कॅटरिना कैफ. हाँगकाँगमध्ये तिचा जन्म झाला होता. भारतीय वंशाचे मोहम्मद कैफ आणि ब्रिटिश वंशाची सुजैन टरकोट यांच्या पोटी जन्मलेल्या कॅटरिनाला लहानपणापासूनच ग्लॅमरचे जग खुणवत होते. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी तिने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि बघता बघता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंतचा पल्ला गाठला.
 
बॉलिवूडमध्ये नवखी असताना कॅटरिनाला हिंदी बोलता येत नव्हते. तिचा अभिनयही सुमार होता. हिंदी येत नाही, त्यात अभिनयाची बोंब. त्यामुळे त्याकाळात तिची बरीच खिल्ली उडवली गेली. हिंदीचं नाही तर अभिनयही न येणारी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टिकणारच नाही, असे भाकीत त्याकाळी अनेकांनी वर्तवले. तिला बरेच नकार पचवावे लागलेत. अनेकांनी तिच्या अभिनयावर टीका केली तर अनेकांनी तिला नाचता येत नाही म्हणून, नाकं मुरडली. तिच्या हिंदीबद्दलही लोक नाही नाही ते बोललेतं. पण कॅटरिना जिगरबाज निघाली. तिने ही सगळी टीका पचवत, स्वतःची अशी काही ओळख निर्माण केली की, लोकांची तोंडं बंद झालीत. आज कॅटचे नाव बॉलिवूडच्याआघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ते म्हणूनच.
 
करिअरच्या सुरूवातीला तिला काही मल्याळम चित्रपटात काम करावे लागले. 2004 मध्ये मल्लीस्वरी आणि 2005 मध्ये आलेल्या अलारी पेडगू या ल्याळ चित्रपटात कॅटरिना दिसली. 2003 मध्ये दिग्दर्शक कायजाद गुस्ताद यांनी कॅटरिनाला एका फॅशन शोमध्ये बघितले नसते तर कदाचित ती बॉलिवूडमध्ये आलीच नसती. या फॅशन शोमध्ये कॅटरिनाला पाहून कायजाद गुस्ताद यांनी तिला 'बूम' या चित्रपटात कास्ट केले.
 
दुसर्‍या वर्षी कॅटरिना सलमान खानच्या डोळ्यात भरली. 'मैने प्यार क्यों किया' मध्ये त्याने तिला कास्ट केले आणि हळूहळू सलमान व कॅटमधील जवळीक वाढली. पुढे तर सलमाननेच कॅटरिनाचे करिअर घडवले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कॅटरिनाच्या करिअरमध्ये सलमानचा मोठा वाटा आहे.