बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जुलै 2018 (10:22 IST)

जान्‍हवीसाठी रक्षाबंधन आहे खास

यंदा अभिनेत्री  जान्‍हवी कपूरसाठी रक्षाबंधन खास आहे. ती या सणाची आतुरतेने, उत्‍सुकतेने वाट पाहत आहे.  कारण ती तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर याला राखी बांधणार आहे.  तिला २१ वर्षानी आपल्‍या सावत्र भावला राखी बांधन्‍याची संधी मिळणार आहे. जान्‍हवीची आई अभिनेत्री श्रीदेवी आणि अर्जुन कपूर यांच्‍यात काहीसे चांगले संबध नव्‍हते. ज्‍यामुळे दोन्‍ही कुटुंबे नेहमीच एकमेकापासून लांब राहिली आहे. पण यावेळी जान्‍हवी कपूर या दोन्‍ही कुटुंबातील हे अंतर कमी करणार आहे. अभिनेत्री  श्रीदेवी यांच्‍या मृत्‍यू नंतर  अर्जुन कपुरने आपल्‍या सावत्र  बहिण जान्‍हवी आणि  खुशी यांची  प्रत्‍येकवेळी काळजी घेताना दिसतो. यासाठीच जान्‍हवी आपल्‍या भावाला  राखी बांधणार आहे.