मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जुलै 2018 (14:29 IST)

एकाचवेळी दोन चित्रपटांच्या तयारीत

गेली दोन वर्षे हिंदी रुपेरी पडद्यापासून बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा दूर गेली आहे. आता ती सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याची बाती आहे. पण तिच्याकडे 'भारत' या चित्रपटाशिवायदेखील अजून एक चित्रपट आहे. 
 
आपल्या इन्स्टाग्रावर एक पोस्ट प्रियांकाने शेअर केली आहे. तिने यात नव्या हिंदी चित्रपटाची तयारी सुरू झाल्याचे म्हटले आहे. सोनाली बोस यांनी लिहिलेल्या कथेवर जुही चतुर्वेदी यांनी डायलॉग लिहिले असल्याचे ती म्हणते. 'द स्काई इज पिंक' हा आगामी चित्रपट प्रियांका करणार आहे. गेली दोन वर्षे अमेरिकन टीव्ही मालिका 'क्वॉन्टिको'चे प्रियांका शूट करीत होती. तिने त्यानंतर 'बेवॉच' या हॉलिवूडपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती आता भारतात परतणार आहे. ती गेल्या काही दिवसांपासून निक जोन्ससोबत डेटिंग करीत असल्याची चर्चा होती. जोन्स अलीकडेच भारतातही येऊन गेला. त्यानंतर ते ब्राझिलला निघून गेले. निक जोन्सचा तिथे म्युझिक कॉन्सर्ट होता. आता ती लवकरच हिंदी पडद्यावर दमदार पाऊल टाकेल याची प्रतीक्षा तमाम चाहत्यांना आहे.