शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'भारत'साठी फुकट काम करणार देसी गर्ल!

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा 'क्वांटिको'चे शूटिंग संपवून नुकतीच भारतात परतली आहे. ती लवकरच सलमानसोबत 'भारत' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या चित्रपटासाठी आता ग्लोबल स्टार झालेल्या प्रियंकाने तब्बल 14 कोटींचे मानधन मागितल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी सर्व मध्यमांमध्ये झळकले होते. बॉलिवूड अभिनेत्रीला मिळणारे हे सर्वात मोठे मानधन होते. पण प्रियंकाने या चित्रपटासाठी एकही रुपया न आकारता मोफत काम करण्याचे ठरवले आहे. 'भारत' चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर करणार असून प्रियंका आणि जाफर यांच्यात मैत्रीचे नाते असल्यामुळे कोट्यवधीचे मानधन प्रियंकाने नाकारल्याचे वृत्त आहे. प्रियंका जाफर यांच्या बिग बजेट चित्रपटात मोफत काम करणार असल्याचे वृत्त 'बॉलिवूड हंगामा' या मनोरंजनविषयक संकेतस्थळाने म्हटले आहे.