मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रियांकाच्या डायलॉगवर हल्ला, भारतीयांना केले दुखी

सिनेतारिका प्रियांका चोप्राच्या एका डायलॉगवर खूप हल्ला सुरू आहे आणि सोशल मीडियावर याची आलोचना होत आहे.
 
जाणून घ्या काय आहे डायलॉग
 
'हे पाकिस्तानी नाही आणि यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. ही माळ कोणत्याही पाकिस्तानी मुसलमानाच्या गळ्यात नसू शकते. हे एक भारतीय राष्ट्रवादी आहे जे पाकिस्तानला फसवू इच्छित आहे.'
 
हा डायलॉग प्रियांकाने अमेरिकी टीव्ही शो क्यांटिको यात म्हटला आहे. तिसर्‍या सीझनचा हा पाचवा एपिसोड आहे. हे क्लिप व्हायरल झाले असून प्रियांका टार्गेट झाली आहे. तिला #ShameOnYouPriyankaChopra आणि #BoycottQuantico सारख्या हॅशटॅग सह ट्रोल केले जात आहे.
 
प्रियांकाने या शोमध्ये एफबीआय एजेंटची भूमिका साकारली आहे. त्यांची टीम काही लोकांना पकडते. ते पाकिस्तानी असल्याची शंका असते. तेवढ्यात एकाच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ दिसते आणि प्रियांकाचा हा डायलॉग ऐकू येतो. इंटरनॅशनल शोमध्ये देशाचा अपमान होत असल्यामुळे प्रियांकावर टीका केली जात आहे. फिल्म दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने ट्विट केले की कोणताही देशप्रेमी भारतीयाने हे नाकारलं असतं. प्रियांकाला ट्रोल केले जात आहे परंतू तिने अजून पर्यंत काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.