रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

बहुसंख्यक भारतीय शाकाहारी असण्याचा दावा कितपत सत्य

भारतात हा मोठा गैरसमज आहे की येथील लोकं शाकाहारी आहे. परंतू सत्य वेगळंच आहे. अंदाजे एक तृतियांश भारतीय शाकाहारी आहार घेतात.
 
सरकारी सर्व्हेनुसार 23 ते 37 टक्के भारतीय शाकाहारी आहेत. परंतू हे आकडे काहीही सिद्ध करत नाही. परंतू अमेरिका येथे राहणार्‍या मानवविज्ञानी बालमुरली नटराजन आणि भारत रहिवासी अर्थशास्त्री सूरज जैकब द्वारे केलेल्या रिसर्चप्रमाणे सांस्कृतिक आणि राजकारणी दबावामुळे हे आकडे अधिक दर्शवले गेले आहे.
 
अर्थात मीट सेवन करणारे मुख्यतः बीफ खाणारे, ते रिपोर्टप्रमाणे शाकाहारी आहे. या गोष्टी लक्षात घेता शोधकर्त्यांप्रमाणे खरं तर 20 टक्के भारतीयच शाकाहारी आहे. ही संख्या आतापर्यंत केलेल्या दाव्याहून कमी आहे. भारताच्या लोकसंख्येत 80 टक्के हिंदू आहेत आणि त्यातून अधिकश्या मीट खातात. एक तृतियांश अगडी जातीचे संपन्न लोकंच शाकाहारी आहेत. सरकारी आकडेनुसार शाकाहारी लोकांची आय अधिक असून ते मीट खाणार्‍यांपेक्षा अधिक संपन्न आहे. 
 
भारतातील शाकाहारी शहर
इंदूर: 49%
मेरठ: 36%
दिल्ली: 30%
नागपूर: 22%
मुंबई: 18%
हैदराबाद: 11%
चेन्नई: 6%
कोलकाता: 4%
(शाकाहारींची सरासरी संख्या. स्रोत: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण)
 
इकडे डॉक्टर नटराजन आणि डॉक्टर जैकब यांच्याप्रमाणे दावे विरुद्ध बीफ खाणार्‍यांची संख्या अधिक आहे.
 
बीफ खाणारे भारतीय
भारत सरकारप्रमाणे सुमारे 17 टक्के भारतीय बीफ खातात. परंतू सरकारी आकडे चुकीचे असल्याचे सिद्ध करता येऊ शकतं कारण भारतात बीफ सांस्कृतिक, राजकारणी आणि सामूहिक ओळख या संघर्षात फसलेले आहे. मोदींची पार्टी शाकाहाराचे प्रचार करते आणि बहुसंख्यक लोकसंख्या गायीला पवित्र मानते म्हणून गायींची रक्षा करावी असे मानले जाते. 
 
एक डझनाहून अधिक राज्यांमध्ये गोवंश वध करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मोदींच्या राज्यात गोरक्षक समूह सर्रास हे काम करत आहे आणि या प्रकरणावर खूनदेखील झालेले आहेत. परंतू खरं तर लाखो भारतीय बीफचे सेवन करतात ज्यात दलित हिंदू, मुस्लिम, ईसाई सामील आहे. उदाहरणार्थ केरळमध्ये 70 समुदाय मेंढीचे महाग मीटऐवजी बीफ खाणे पसंत करतात. 
 
डॉक्टर नटराजन आणि डॉक्टर जैकब यांच्याप्रमाणे सुमारे 15 टक्के भारतीय किंवा 18 कोटी लोकं बीफ खातात. हे सरकारी आकड्यापेक्षा 96 टक्के अधिक आहे.
 
दिल्लीत एक एक तृतियांश लोकंच शाकाहारी आहेत. हे त्या शहराला मिळालेल्या 'भारताची बटर चिकन राजधानी' या टॅगप्रमाणेच आहे. परंतू दक्षिण भारतीय शाकाहारी भोजनाचे गड चेन्नई या शहराची धारणा अगदी भ्रामक आहे. एक सर्व्हेप्रमाणे शहरातील केवळ 6 टक्के रहिवासीच शाकाहारी आहे.
 
सर्वांना माहीत आहे की पंजाब चिकन पसंत करणार्‍यांचे राज्य आहे. परंतू खरं तर उत्तरी राज्याचे 75 टक्के लोकं शाकाहारी आहेत.
 
आहाराबद्दल गैरसमज
तर गैरसमज निर्माण व्हायचे कारण काय की भारत शाकाहारींचा देश आहे?
 
डॉक्टर नटराजन आणि डॉक्टर जैकबप्रमाणे, "आहारात भारतीय समाजात खूप विविधता आहे. काही अंतराळात सामाजिक समूहांमध्ये व्यंजन वेगळे असतात. आणि अनेकदा प्रभावशाली घेत असलेल्या आहाराला गृहीत धरलं जातं. समाजात शाकाहारी सेवन करणार्‍यांचे स्थान मीटपेक्षा वर आहे.
 
तसेच काही धारणा बाह्य लोकांमुळे निर्मित होतात. सर्व्हेमध्ये काही गोष्टींना आधार समजून धारणा निर्मित होते. अध्ययनाप्रमाणेच पुरुषांपेक्षा महिला अधिक संख्येत शाकाहारी असतात कारण शाकाहाराची परंपरा निभावण्याची जबाबदारी महिलांवर असते कारण पुरुष अधिक स्वातंत्र्यपूर्ण घराबाहेर आहार सेवन करतात. तसेच बाहेर आहार घेणे म्हणजे मीट खाणे याचा अर्थ असा नव्हे.
 
सर्व्हेप्रमाणे सुमारे 65 टक्के घरात राहणारे जोडपे मासांहारी आणि 20 टक्के शाकाहारी आढळले. परंतू त्यातून 12 टक्के असे लोकं आढळले ज्यात पती मीट खातो आणि पत्नी शाकाहारी आहे. केवळ तीन टक्के स्त्रियाच मासांहारी होत्या आणि पती शाकाहारी. अर्थातच अधिक भारतीय कोणत्याही रूपात का नसो मास खातात, मग कधी-कधी किंवा दररोज का नसो. जसे की चिकन आणि मटण. शाकाहारी लोकांची संख्या अधिक नाही.
 
तर भारतात शाकाहारच प्रभाव अधिक का आणि दुनियेत भारताची या इमेजमागे काय कारण? याचा अर्थ येथे आहार निवडण्याच स्वातंत्र्य नाही ज्यामुळे जटिल आणि बहुसांस्कृतिक संस्थांमध्ये आहार याबद्दल वेगळीच संकल्पना घडत आहेत?