रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (12:04 IST)

लाहोर हायकोर्टाने हाफीजला ठरवले समाजसेवक

संयु्रत राष्ट्रसंघ, भारत आणि अमेरिकेच्या लेखी मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असला तरी पाकमध्ये मात्र त्याला 'समाजसेवक' मानले जात आहे. लाहोर हायकोर्टाच्या एका ताज्या आदेशातून तसाच संदेश जगभरात गेला आहे. हाफीजचे समाज कल्याणाचे काम सुरू राहू द्या. कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत त्याला त्रास होईल, असे कोणतेही धोरण अवलंबू नका, असेही या आदेशात म्हटले आहे.