बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (10:05 IST)

सलमानला आसाराम बापूचा शेजार

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालानंतर सलमान खान जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना झाला आहे. याच जेलमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आसाराम बापूही आहे. आसाराम बापूच्या शेजारीच सलमान खानला ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील वेळेस जेव्हा सलमान खानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा त्याला बरॅक नंबर १ मध्ये ठेवण्यात आले. तेथे सलमान पाच दिवस होता. तेव्हा त्याचा कैदी क्रमांक ३४३ होता. 
 
खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावूक झाला होता.सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडल्या. यावेळी अलवीराने सलमानला पाणी आणि अंटी डिप्रेशनचे ओषधे दिली.