सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (11:26 IST)

एसआरएस ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा

एसआरएसध्ये पंजाब नॅशनल बँकेहून मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. रिअल इस्टेटमधली नावाजलेली कंपनी असलेल्या एसआरएस ग्रुपने 20 हजार कुटुंबीयांचे फ्लॅट देण्याच्या नावाखाली 30 हजार कोटी रुपये हडप केल्याचा आरोप आहे. रिअल इस्टेटमधील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते. या घोटाळ्यात हरियाणा पोलिसांनी एसआरएस समूहाचे अध्यक्ष अनिल जिंदालसह पाच जणांना अटक केली आहे. यात बिशन बन्सल, नानक चंद तायल, विनोद मामा आणि देवेंद्र अधाना यांचा समावेश आहे.
 
एसआरएस समूहावर बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊनही परत न केल्याचा आरोप आहे. या पाचजणांच्या अटकेनंतर पोलीस उपायुक्त विक्रम कपूर यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.