सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जखमी

कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार झालाआहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. एका बंदुकधारी महिलेनं मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार केला व यानंतर स्वतःवरच  गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी लोकांनी घाबरुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळापळ करण्यास सुरुवात केली. 
 
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यु-ट्यूब मुख्यालयात गोळीबार करणारी महिला इमारतीत मृतावस्थेत आढळून आली. गोळीबार केल्यानंतर तिनं स्वतःवर गोळी झाडली. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अॅम्ब्युलन्स दाखल झाली. पोलिसांनी लोकांना घटनास्थळी न येण्याचं आवाहन केले.

यानंतर काही काळ यु-ट्युबचे मुख्यालयदेखील बंद करण्यात आले व लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे कार्य सुरू करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  यु-ट्यूबच्या मुख्यालयात करण्यात आलेला गोळीबार घरगुती वादातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.