रशिया: पुतिन यांचा पुन्हा एकदा विजय
रशियामध्ये विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. पुतिन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीत सहभागी होते. परंतु गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी तब्बल ७३.९ टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे आता आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार आहे.
पुतिन यांची कार्यशैली पाहता त्यांना हुकुमशाह असे म्हटले जाते. आणि म्हणूनच मतदानादरम्यान मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता, असे दावे रशियातील राजकीय तज्ज्ञांनी केले होते. परंतु पुतिन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.