बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025 (19:52 IST)

न्यूज अँकरने ऑफिसमध्येच गळफास घेतला

न्यूज अँकरने ऑफिसमध्येच गळफास घेतला
ऑफिसमध्ये एका न्यूज अँकरने केलेल्या आत्महत्येमुळे गुवाहाटीत खळबळ उडाली आहे. न्यूज अँकरचे लग्न अवघ्या १२ दिवसांनी होणार होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार आसाममधील प्रमुख शहर गुवाहाटी येथे एका न्यूज अँकरने केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. स्थानिक डिजिटल न्यूज पोर्टलवर अँकर असलेल्या रितुमोनी रॉयने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना काल, सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी घडली. सोमवारी पहाटे तिचा मृतदेह ख्रिश्चन बस्ती येथील तिच्या ऑफिसमध्ये आढळला.
 
रितुमोनी रॉयच्या आत्महत्येने संपूर्ण संस्थेवर आणि कुटुंबावर दुःखाची लाट पसरली आहे. रितुमोनीचे लग्न पुढील महिन्यात, डिसेंबरमध्ये होणार होते. तिच्या लग्नाच्या पत्रिका आधीच वाटण्यात आल्या होत्या. रितुमोनी रॉयच्या आत्महत्येनंतर कुटुंबातील आनंदाचे वातावरण अचानक शोकात बदलले आहे. आनंदाच्या वातावरणात अचानक घडलेल्या या दुर्घटनेने सर्वजण स्तब्ध आहे. तसेच आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून पोलिसांना एक छोटी सुसाईड नोट देखील जप्त करण्यात आली आहे. 
सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, "हे सर्वांच्या कल्याणासाठी आहे. मला माफ करा." रितुमोनीच्या सुसाईड नोटमध्ये यापेक्षा जास्त काही नाही. रितुमोनीने तिच्या आत्महत्येचे कारण सांगितले नाही. त्यामुळे, हे गूढ उलगडणे पोलिसांसाठी निश्चितच कठीण होईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रितुमोनी रविवारी, २३ नोव्हेंबर रोजी ऑफिसमध्ये गेली होती. तिची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी परतली नाही. तिने यापूर्वी एका मैत्रिणीच्या घरी लग्नापूर्वीच्या समारंभात भाग घेतला होता. तिथून रितुमोनी थेट ऑफिसमध्ये गेली आणि तिच्या आत्महत्येच्या बातम्या समोर आल्या.
Edited By- Dhanashri Naik