भाजपला मोठा हादरा! 18 नेत्यांचा राजीनामा
आसाममध्ये भाजपला मोठा धक्का बसला आह. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजेन गोहेन यांच्यासह १८ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आसाममधील ज्येष्ठ भाजप नेते राजेन गोहेन यांच्यासह अठरा नेत्यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे, ज्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गोहेन यांनी प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. राजेन गोहेन यांनी प्रदेश भाजप अध्यक्ष दिलीप सैकिया यांना लिहिलेल्या पत्रात आपला निर्णय जाहीर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ते तात्काळ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व जबाबदाऱ्यांवरून राजीनामा देत आहे.यामुळेच भाजप नेते राजीनामा देत आहे
सूत्रांनुसार, राजीनामा देणारे बहुतेक सदस्य अप्पर आणि मध्य आसाममधील आहे. पत्रकारांशी बोलताना राजेन गोहेन म्हणाले की, पक्षाने "आसामच्या लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे आणि स्थानिक समुदायांशी विश्वासघात केल्याने" त्यांनी राजीनामा दिला.
Edited By- Dhanashri Naik