गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (09:22 IST)

आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात, लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

Train Accident
आसाममधील डिब्लाँग स्टेशनजवळ आगरतळा-लोकमान्य टिळक एक्सप्रेस रेल्वेला भीषण अपघात झाला आहे. रेल्वेचे 8 डबे रुळावरून घसरले. तसेच रेल्वे प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू होते. सुदैवाने रेल्वेमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वेचे 8 डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला हा अपघात झाला, त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या वळवण्यात आल्या होत्या. पण या अपघातात सुदैवाने एकही प्रवासी जखमी झाल्याची बातमी नाही.  
 
आसाममधील डिब्लाँग स्टेशनजवळ आगरतळा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस गुरुवारी रुळावरून घसरली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना बोगीतून बाहेर काढले. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहे. आता टीम या अपघातामुळे बाधित झालेल्या ट्रॅकची साफसफाई करत आहे. पण, रेल्वे अपघाताचे कारण अजून समजू शकलेले नाही.