मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By
Last Updated : सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (07:53 IST)

कोजागरी पौर्णिमा 2025 : आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' का म्हणतात, महत्त्व जाणून घ्या

Kojagari Pournima 2025
कोजागरी पौर्णिमा 2025 : कोजागरी पौर्णिमा, जी आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, ही हिंदू संस्कृतीत विशेष स्थान राखणारी पौर्णिमा आहे. या रात्री चंद्र पूर्ण तेजस्वी आणि गोलाकार दिसतो, ज्यामुळे या रात्रीला "कोजागरी" (कोण जागे आहे?) असे नाव पडले आहे. 
पौराणिक कथेनुसार, या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे कोणी जागे राहून तिची पूजा करतात, त्यांच्यावर ती कृपा करते. या रात्री जागरण आणि पूजा करण्याची प्रथा आहे, ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' म्हणतात कारण या दिवशी रात्री उत्तररात्री लक्ष्मीदेवी पृथ्वीवर फिरत येऊन 'को जागर्ति' (कोण जागत आहे?) असे विचारते, आणि जो जार्गत असतो त्याला ती आशीर्वाद देते असे मानले जाते. 'को जागर्ति' या संस्कृत शब्दाच्या आधारावर या पौर्णिमेला 'कोजागरी पौर्णिमा' असे नाव मिळाले आहे. 
 
कोजागिरीचे महत्त्व -
या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी कोजागिरीच्या रात्री पृथ्वीवर भ्रमण करते आणि कोण जागे आहे असे विचारते. या दिवशी घराला स्वच्छ करून दीप प्रज्वलन करून दुधाला आटवून त्यात सुकेमेवे, चारोळ्या घालून रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. जेणे करून चंद्रमाच्या अमृत किरणा त्यात पडतील. त्या दुधाचा देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवतात. 
ही पौर्णिमा शरद ऋतूच्या आगमनाची प्रतीक असल्याने ह्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. 
या रात्री चंद्रमाचे सौंदर्य बघण्यासाठी कुटुंबातील सर्व जण एकत्र येतात आणि चंद्रमाच्या प्रकाशात घरातील मोठ्या अपत्याचे मग ती मुलगी असो किंवा मुलगा. पाटावर बसवून औक्षण केले जाते. आणि त्यांना भेटवस्तू दिली जाते. रात्री जागरण केले जाते गाणे आणि नृत्याचा आनंद घेतला जातो. 
कोजागिरीचा संबंध शेतकऱ्यांशी देखील आहे. कारण हा काळ खरीप पिकांच्या कापणीचा आहे. शेतकरी आपल्या पिकांच्या समृद्धीसाठी लक्ष्मी आणि इंद्रदेवाची पूजा करतात.
या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करताना को जागृती असे विचारते. त्यामुळे या रात्री जागरण करणे महत्त्वाचे आहे. जेणे करून देवी लक्ष्मी आशीर्वाद देते. 
चन्द्रमाचे औक्षण करून त्याला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतात. 
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाण्याची प्रथा आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते असे मानले जाते.
आयुर्वेदानुसार, या रात्री चंद्राची किरणे शीतल आणि औषधी गुणांनी युक्त असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.हा सण शरद ऋतूच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचा सण आहे. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit