बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 जानेवारी 2024 (10:42 IST)

Assam: सहलीला जाणाऱ्या बस आणि ट्रकची धडक, 14 जणांचा मृत्यू, 27 गंभीर जखमी

accident
आसाममध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथील डेरेगाव येथे 45 जणांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 27 जण गंभीर जखमी आहेत. 
 
पोलिसांचे म्हणणे आहे की बसमध्ये बसलेले लोक आठखेलियाहून बालीजानच्या दिशेने सहलीसाठी जात होते. वाटेत बसची ट्रकला धडक बसली. पहाटे तीन वाजता बसचा प्रवास सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाटेत तो कोळशाने भरलेल्या ट्रकला धडकला.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना कशी घडली याचा तपास पोलीस करत आहेत.
 
Edited by - Priya Dixit