1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (17:25 IST)

Accident : ट्रक व जीप ची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू , तिघे जखमी

पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ ट्रक ला जीपने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी पहाटे घडली आहे. दाट धुक्यामुळे जीपच्या चालकाचे नियंत्रण चुकले आणि जीप ट्रक ला मागून जाऊन धडकली. 

ही जीप सटाणा तालुक्याचा सायखेडा येथून पुण्याकडे निघाली होती. दाट धुक्यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण चुकले आणि जीप ट्रकला मागून जाऊन धडकली त्यात जीप चालक पंकज खंडू जगताप(36), मधुकर तुकाराम अहिरे(52), शांताराम संभाजी अहिरे(50) यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

हे सर्व राहणारे सायखेडा ,तालुका सटाणा जिल्हा नाशिकचे होते. तर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना मंचरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.     
पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर ते  घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठविले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत केली. पोलिसांनी अपघाताचे कारण दाट धुकं असल्याचे सांगितले. पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit