सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (14:20 IST)

Pune : ट्रक चालवताना हृदयविकाराच्या झटक्यानं ट्रक चालकाचा मृत्यू

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटका हून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकच्या चालकाचा ट्रक चालवता असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणी काळभोर ग्राम पंचायत हद्दीत मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हे घडले असून सतपाल झेंटिंग कावळे (45) असे या मयत ट्रक चालकाचे नाव आहे. 

सतपाल हे कर्नाटकाहून ट्रक मध्ये माल भरून पुण्याच्या दिशेने जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना ट्रक लोणी काळभोर ग्राम पंचायतीच्या हद्दीत माळी मळा परिसरात आले असता त्यांच्या छातीतून अचानक कळ उठली त्यांनी ट्रक रत्यातून बाजूला केला आणि त्यांनी खाली उतरून आपल्या नातेवाईकांना फोन करून छातीत वेदना होत असल्याचं सांगितले. नातेवाईकांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

कावळे यांनी जेवण केलं आणि जरावेळ विश्रांती घेण्यासाठी झोपले असता त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. 
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस रुग्णवाहिकासह दाखल झाले. मात्र उपचारापूर्वीच कावळे यांना मृत्यूने कवटाळलं.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit