सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (08:32 IST)

पुणे : सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा धक्का

Serum Institute of India
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा धक्का बसला. पुणे येथील रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले की, 82 वर्षीय पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा धक्का बसला. आता त्यांची प्रकृतीती सुधारणा झाली आहे.
 
रूबी हॉल क्लिनिककडून या संबंधित एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले की, डॉ. सायरस पूनावाला यांना 16 नोव्हेंबर 2023 रोजी हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याने त्यांना रुबी हॉल येथे दाखल करण्यात आले. शुक्रवारी पहाटे सायरस पुनावाला यांच्यावर डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. ते लवकर बरे होत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल. डॉ. पुनावाला यांची तब्येत सध्या चांगली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor