रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (20:39 IST)

पुण्यातील टोळक्याने युवकाकडून उकळले 60 हजार रुपये

pitai
पुणे - येथे एका टोळक्याने येरवड्याच्या एकता हाउसिंग सोसायटीनजीक एका युवकास नग्न करत नाचाण्यास भाग पाडल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमनाथ कोंडीबा राजपूत ,चंद्रकांत बबन लांडगे ,संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले यांच्यावर येरवडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर माहितीनुसार, पीडित युवक (वय 33) लोणावळा परिसरातील राहिवासी असून, त्यास संशयितांनी फोन करत तुझा भाऊ येरवड्यात आला आहे. तू त्याला भेटायला ये म्हणून बोलवले.
 
 पीडित  आल्यानंतर त्याला बेल्टने मारहाण करून त्याला नग्न करत नाचायला भाग पाडले. त्यावेळी त्याचे व्हिडिओ शूटिंग करून सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 60 हजार रुपये उकळले. घटनेनंतर संशयितांचा शोध येरवडा पोलीस घेत आहे.
 



Edited By- Ratnadeep Ranshoor