रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (16:12 IST)

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

eknath khadase
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटक्याचा त्रास जाणवू लागल्यावर त्यांना तातडीनं मुंबईत आणणार आहे. त्यांना मुंबईत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एअर एम्बुलन्स ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे. 
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आज दुपारी जळगाव येथे हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीनं जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना एअर ऍम्ब्युलन्स ने मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या आहे.खडसे यांना थोड्याच वेळात मुंबईत आणणार आहे.  
 
 
Edited by - Priya Dixit