शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (12:34 IST)

Gram Panchayat Election :ग्रामपंचायत निवडणुकीत राडा

voting machine
Gram Panchayat Election :आज राज्यात 2 हजार 369 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मतदानास सर्वत्र सुरुवात झाली आहे. 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान हाेत आहे.जवळपास तीन हजार उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीत कैद होणार आहे. मतदान केंद्रावर पोलीस तैनात आहे. 
 
 कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत नेहमीच गोंधळ होताना दिसतो. या ठिकाणी नेहमी संघर्ष होतो. कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण भागात चिंचवाड ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदान केंद्राच्या एका बूथ वर उमेदवार आणि प्रतिनिधी एकमेकांना भिडल्याने मोठा राडा झाला. हा सर्व प्रकार माध्यम प्रतिनिधींनी कैमऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी त्यांना अडवले. या प्रकारात एकमेकांना अपशब्दांचा वापर करण्यात आल्या शिव्या देण्यात आल्या.मात्र पोलिसांची भूमिका बघ्याची दिसली. त्यामुळे हे प्रकरण चिघळले.  
 
ग्राम पंचायतचे उमेदवारांचे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना बघण्यावरून बाचाबाची झाली नंतर त्या वरून ते एकमेकांना भिडले. या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. नंतर उमेदवार प्रतिनिधीला मतदान केंद्रावरून बाहेर काढण्यात आलं. यावरून त्या प्रतिनिधीने अन्य काही कार्यकर्त्यांना घेऊन आले आणि दोन्ही कार्यकर्त्ये एकमेकांच्या समोर येऊन राडा झाला. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना तिथून हाकलले.
 
Edited by - Priya Dixit