कोजागरी पौर्णिमेला पारंपरिक बासुंदीला द्या चॉकलेट ट्विस्ट; मुलांची फेव्हरेट डिश
कोजागिरी पौर्णिमा हि मोठी पौर्णिमा मानली जाते. तसेच या दिवशी गुलाबाईचे देखील विसर्जन केले जाते. व दूध आटवून बासुंदी बनवली जाते. नेहमी आपण बासुंदी बनवतो पण ही कोजागिरी काही कास असणारा आहे कारण आपण चॉकलेट बासुंदीची पाककृती पाहणार आहोत जी मुलांना फार आवडले. नेहमीच्या बासुंदीला आपण यावेळेस चॉकलेट ट्विस्ट देऊ या. जी मुलांची फेव्हरेट कोजागरी स्पेशल डिश असेल.
चॉकलेट बासुंदी रेसिपी
साहित्य-
दूध-एक लिटर
साखर-अर्धा कप
व्हॅनिला इस्सेन्स अर्धा टीस्पून
किसलेले बदाम, काजू, पिस्ते
किसमिस -एक चमचा
चॉकलेट सॉस किंवा कोको पावडर-तीन चमचे
तूप -एक टीस्पून
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या कढईत दूध गरम करा आणि मध्यम आचेवर सतत हलवत राहा. आता साखर घालून उकळवा. तसेच दूध अर्ध्या प्रमाणात घट्ट होईपर्यंत उकळवा. व आता चॉकलेट सॉस/कोको पावडर मिसळा, दूध घट्ट झाल्यावर कोको पावडर किंवा चॉकलेट सॉस नीट मिसळा. तसेच फळे व ड्रायफ्रूट्स टाका. किसलेले बदाम, काजू, पिस्ते व किसमिस घालून हलवा. आता व्हॅनिला इस्सेन्स आणि तूप घाला. वरून आणखी थोडे ड्रायफ्रूट्स सजवा. व तयार चॉकलेट बासुंदी थंड करून मुलांना नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik