Anant Chaturdashi 2025: गणपती बाप्पाला निरोप देतांना नैवेद्यात बनवा या पाककृती
आज अनंत चतुर्दशी म्हणजेच लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ होय. तसेच बाप्पाला काय खास नैवेद्य द्यावा म्हणजे पुढच्यावर्षी गणपती बाप्पा लवकर येतील व आशीर्वाद देतील. तर अशा वेळेस या खास पाककृती नक्कीच गणपती बाप्पाला नैवेद्यात अर्पण करा.
रव्याचा हलवा
साहित्य-
एक कप- रवा
अर्धा कप- तूप
एक कप-साखर
तीन कप- पाणी
चिरलेला काजू आणि वेलची पूड
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि रवा घाला आणि मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.दुसऱ्या पॅनमध्ये पाणी आणि साखर घाला आणि उकळी आणा. भाजलेल्या रव्यात हळूहळू उकळलेले पाणी घाला आणि सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. ते घट्ट झाल्यावर वेलची पूड आणि काजू घाला आणि मिक्स करा.
केळीचा शीरा
साहित्य-
एक कप- रवा
अर्ध कप- तूप
दोन पिकलेली- केळी
एक कप- साखर
तीन कप- दूध किंवा पाणी
चिरलेले काजू आणि वेलची पावडर
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि रवा घाला आणि तो सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये दूध किंवा पाणी आणि साखर उकळवा.भाजलेल्या रव्यात उकळलेले दूध किंवा पाणी घाला आणि चांगले मिसळा. केळी, काजू आणि वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा. २-३ मिनिटे शिजवा आणि आग बंद करा.
मोदक
साहित्य-
एक वाटी- मैदा किंवा गव्हाचं पीठ
दोन चमचे- रवा पर्यायी, कुरकुरीतपणासाठी
दोन चमचे- तेल (मोहनासाठी)
पाणी
चिमूटभर मीठ
तळण्यासाठी तेल
सारण- खोबरं-गूळ किंवा खवा-खडीसाखर
कृती-
सर्वात आधी मैदा, रवा, मीठ आणि तेल एकत्र मळून कणीक तयार करा. १५ मिनिटं झाकून ठेवा.सारण वरीलप्रमाणे तयार करा. कणकेची छोटी पारी पाडून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. आता मध्यम आचेवर तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik