सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Updated : शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (09:23 IST)

कोजागिरी पौर्णिमा स्पेशल केशर बादाम दूध

kesar milk
दूध- 1 लीटर
साखर - चमचे
बादाम- 1/2 वाटी
वेलची पूड 1 लहान चमचा
केशर - 10 ते 12 पाकळ्या
 
केशर बादाम दूध बनवण्यासाठी बादाम एक तासापूर्वी भिजत घाला. नंतर त्याचे सालं काढून घ्या.
आता बादाम जराश्या दुधासोबत वाटून घ्या.
दुसरीकडे एका वाटीत कोमट दुधात केशर घालून ठेवा.
आता दूध मंद आचेवर उकळू द्या.
दूध उकळत असताना त्या बादाम पेस्ट घाला.
बादाम- दूध चांगल्या प्रकारे उकळू लागल्यावर त्या साखर घाला.
आता दुधात वेलची पूड आणि केशर मिसळलेलं दूध घाला.
आता गरमागरम केशर बादाम दूध सर्व्ह करा.
आपण त्यावर सुके मेवे टाकून गार्निश करु शकता.