आश्विन पौर्णिमेला करू नयेत अशा चुका
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा* म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी लक्ष्मी पूजन, चंद्रदर्शन आणि जागरण यांना विशेष महत्त्व आहे. या शुभ दिनाचे पावित्र्य आणि लाभ टिकवून ठेवण्यासाठी काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे. तर चला जाणून घेऊ या कोणत्या अश्या चुका आहे ज्या पौर्णिमेला करून नये.
आश्विन पौर्णिमेला करू नयेत या चुका-
घर अस्वच्छ ठेवणे-
कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेचे आगमन होते, त्यामुळे घर आणि पूजा स्थळ स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अस्वच्छ घरात पूजा करणे अशुभ मानले जाते.
घरात अंधार ठेऊ नका-
कोजागरी पौर्णिमेला घरात अंधार ठेवणे अशुभ मानले जाते. घरात दिवे, पणत्या लावून प्रकाशमय वातावरण ठेवावे.
लक्ष्मी पूजनात निष्काळजीपणा-
लक्ष्मी पूजन श्रद्धेने आणि योग्य विधींनी करावे. पूजेच्या साहित्यात किंवा मंत्रोच्चारात चूक करणे टाळा. तसेच पूजा साहित्य अपूर्ण ठेवणे, मंत्र चुकीचे म्हणणे किंवा पूजा अर्धवट सोडणे. हे टाळावे.
नकारात्मक विचार किंवा वादविवाद-
या दिवशी मन शांत आणि सकारात्मक ठेवावे. लक्ष्मी माता सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे घरात वाद किंवा नकारात्मकता टाळावी. तसेच कोणाशी भांडण करू नका, रागावणे किंवा नकारात्मक बोलणे देखील टाळावे.
चंद्रदर्शन दुर्लक्ष-
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. चंद्राला दूध किंवा खीर अर्पण करून त्याचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. चंद्रदर्शन न करणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे. अशी चूक करू नका.
मांसाहार किंवा मद्यपान-
आश्विन पौर्णिमा हा सात्त्विक आणि पवित्र दिवस आहे. या दिवशी मांसाहार, मासे, अंडी किंवा मद्यपान करणे अशुभ मानले जाते. तामसी भोजन किंवा व्यसन करणे टाळावे.
जागरण न करणे-
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करणे शुभ मानले जाते. तसेच रात्री लवकर झोपणे किंवा जागरणाची परंपरा पाळण्यात टाळाटाळ करणे या चुका करू नये.
लक्ष्मीचा अनादर-
लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्र यांचा अनादर होईल असे कृत्य करू नये.पूजा स्थळावर अपवित्र वस्तू ठेवणे किंवा मूर्तीला अयोग्य पद्धतीने हात लावणे. हे टाळावे.
धनाचा अपमान करणे-
लक्ष्मी माता धन आणि समृद्धीची देवता आहे. या दिवशी पैसे, नाणी किंवा मौल्यवान वस्तूंचा अनादर करू नये. पैसे उधळणे, बेजबाबदारपणे खर्च करणे. हे टाळावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik