संबंधित माहिती
- या हिरोमुळे करण जोहर होळी साजरी करत नाही
- Couple First Holi 2026 नवविवाहित जोडप्यांसाठी स्पेशल टिप्स, पहिली होळी खास बनवा!
- Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!
- भारतात या ठिकाणी होलिका दहन त्यांच्या परंपरा आणि भव्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध
- Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती
Traditional Sweets होळीनिमित्त बनवा पारंपरिक मिठाई
होळीच्या सणाला घराघरात गोडधोड बनवण्याची लगबग असते. प्रादेशिक परंपरेनुसार भारतात अनेक प्रकारच्या मिठाई बनवल्या जातात. तुम्हाला या होळीला काहीतरी खास बनवायचे असेल, तर आज आपण पारंपरिक मिठाई पाककृती पाहणार आहोत.
१. पुरणपोळी (महाराष्ट्राची शान)
महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीशिवाय पूर्णत्व येत नाही. ही मिठाई केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही पौष्टिक मानली जाते.
मुख्य साहित्य: चणा डाळ, गूळ किंवा साखर, वेलची पूड, जायफळ आणि कणिक.
खास वैशिष्ट्य: गरम पुरणपोळीवर साजूक तुपाची धार आणि सोबतीला कटाची आमटी किंवा दूध असेल तर तिची चव द्विगुणित होते.
२. खव्याची करंजी (उत्तर भारतीय पद्धत)
उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये 'गुजिया' हा होळीचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रात आपण याला 'करंजी' म्हणतो, पण तिथल्या सारणात खव्याचा (मावा) वापर जास्त होतो.
मुख्य साहित्य: मैदा, खवा (मावा), सुकामेवा, साखर आणि तूप.
खास वैशिष्ट्य: ही मिठाई खुसखुशीत असते आणि अनेक दिवस टिकते. हल्ली काही लोक ही गुजिया साखरेच्या पाकात घोळवून 'चाचणी वाली गुजिया' देखील बनवतात.
३. मालपुवा (रबडीसोबत)
राजस्थान आणि बिहारमध्ये होळीला मालपुवा आवर्जून बनवला जातो. हे एक प्रकारचे गोड पॅनकेक्स आहे जे तळल्यानंतर साखरेच्या पाकात बुडवले जातात.
मुख्य साहित्य: मैदा किंवा गव्हाचे पीठ, दूध, सोप आणि साखर.
खास वैशिष्ट्य: गरम मालपुव्यावर थंडगार केशरयुक्त रबडी टाकून खाणे हा एक शाही अनुभव असतो.
४. बेसन बर्फी
होळीला बेसनाच्या पिठाचा वापर करून दाणेदार बर्फी बनवा आणि ती खा.
मुख्य साहित्य: बेसन, तूप, साखर,
खास वैशिष्ट्य: जर तुम्हाला बेसन बर्फी बनवायची असेल, तर बेसन तुपात खमंग भाजून त्यात साखरेचा पाक घालून वड्या थापता येतात.
अन्नकुट (गव्हाची खीर): अनेक ठिकाणी गव्हाच्या जाड्या कण्यांची खीर बनवली जाते.
साखर गाठी: लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या रंगीत साखरेच्या माळा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
१. पुरणपोळी (महाराष्ट्राची शान)
महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीशिवाय पूर्णत्व येत नाही. ही मिठाई केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही पौष्टिक मानली जाते.
मुख्य साहित्य: चणा डाळ, गूळ किंवा साखर, वेलची पूड, जायफळ आणि कणिक.
खास वैशिष्ट्य: गरम पुरणपोळीवर साजूक तुपाची धार आणि सोबतीला कटाची आमटी किंवा दूध असेल तर तिची चव द्विगुणित होते.
२. खव्याची करंजी (उत्तर भारतीय पद्धत)
उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये 'गुजिया' हा होळीचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रात आपण याला 'करंजी' म्हणतो, पण तिथल्या सारणात खव्याचा (मावा) वापर जास्त होतो.
खास वैशिष्ट्य: ही मिठाई खुसखुशीत असते आणि अनेक दिवस टिकते. हल्ली काही लोक ही गुजिया साखरेच्या पाकात घोळवून 'चाचणी वाली गुजिया' देखील बनवतात.
३. मालपुवा (रबडीसोबत)
राजस्थान आणि बिहारमध्ये होळीला मालपुवा आवर्जून बनवला जातो. हे एक प्रकारचे गोड पॅनकेक्स आहे जे तळल्यानंतर साखरेच्या पाकात बुडवले जातात.
मुख्य साहित्य: मैदा किंवा गव्हाचे पीठ, दूध, सोप आणि साखर.
खास वैशिष्ट्य: गरम मालपुव्यावर थंडगार केशरयुक्त रबडी टाकून खाणे हा एक शाही अनुभव असतो.
४. बेसन बर्फी
होळीला बेसनाच्या पिठाचा वापर करून दाणेदार बर्फी बनवा आणि ती खा.
मुख्य साहित्य: बेसन, तूप, साखर,
खास वैशिष्ट्य: जर तुम्हाला बेसन बर्फी बनवायची असेल, तर बेसन तुपात खमंग भाजून त्यात साखरेचा पाक घालून वड्या थापता येतात.
ALSO READ: New flavors of Karanji; यंदाच्या होळीला पारंपारिक करंजीचे हे हटके फ्लेवर्स नक्की बनवून पाहा
इतर काही लोकप्रिय पदार्थ
थंडाई: सुकामेवा आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरून बनवलेले थंड पेय.अन्नकुट (गव्हाची खीर): अनेक ठिकाणी गव्हाच्या जाड्या कण्यांची खीर बनवली जाते.