मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्याला प्रियांका चोप्राची हजेरी

बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्राने ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या लग्नाला प्रियांका हजर राहणार की नाही याविषयीच्या बऱ्याच चर्चांना कलाविश्वात उधाण आले होते. युकेमध्ये पोहोचल्यानंतर सोशल मीडियावरून प्रियांका चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असल्याचे पाहायला मिळाले.
ज्यावेळी प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा करण्यात आली तेव्हाही प्रियांकाने या दोघांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता या विवाहसोहळ्यात प्रियांकाचा शाही अंदाज पाहायला मिळाला. फिकट जांभळ्या रंगाचा ड्रेस आणि हॅट अशा पोशाखात ‘देसी गर्ल’ या शाही विवाहसोहळ्यात अवतरली.