सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रियांकाला हवा आहे असा पती

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या कामामुळे आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलीवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणार्‍या प्रियांका चोप्राने नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या होणार्‍या पतीकडून काय अपेक्षा आहेत याचा खुलासा केला.
 
प्रियांका म्हणाली की जर तिचा पार्टनर तिची काळजी घेऊ शकला नाही आणि तो स्मार्ट नसला तर त्यांच्यात पुढे काहीच होणार नाही. इतकेच नाहीतर प्रियांकाने हेही सांगितले की तिचा पार्टनर जर तिला एंगेज ठेवू शकला नाहीतर ती त्याच्यासोबतच राहणार नाही.
 
तसेच मी खूप भावूक आणि रोमँटिक आहे, त्यामुळे माझा पतीही तसाच असावा असं मला वाटतं असंही प्रियांकाने यावेळी म्हटले आहे.