बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘तुम्हारी सुलू’चाही दुसरा भाग बनवणार

‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाचे सहनिर्माते भूषण कुमार यांनी म्हटले आहे की ते ‘हिंदी मीडियम-2’ बरोबरच ‘तुम्हारी सुलू’चाही दुसरा भाग बनवणार आहेत. भूषण कुमार यांनी सांगितले, कोणत्याही फ्रँचाईजी फिल्मचा एक वेगळा ब्रँड व्हॅल्यू असतो. काही दिवसांपूर्वीच ‘गोलमाल’चा चौथा भाग आला.

‘फुकरे’च्या दुसर्‍या भागानेही मोठे यश मिळवले. मात्र, आम्हाला एखाद्या हिट चित्रपटाचा पुढचा भाग बनवण्यासाठी कंटेंटवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या आम्ही आमच्या प्रॉडक्शनच्या सर्व फ्रँचाईजीवर काळजीपूर्वक काम करीत आहोत. लोकांसमोर चांगली कथा यावी, असा आमचा प्रयत्न आहे. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही ‘आशिकी-3’ आणि ‘तुम्हारी सुलू-2’ बनवणार आहोत. इरफान खानबरोबर आम्ही ‘हिंदी मीडियम-2’ आणि ‘हेट स्टोरी-4’ ही बनवत आहोत.