शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:13 IST)

‘तुम्हारी सुलू’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित

see-the-first-teaser-poster-of-vidhya-balans-new-movie-tumhari-sulu

अभिनेत्री विद्या बालनच्या  ‘तुम्हारी सुलू’चा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झालाय. ‘एलिप्सिस एन्टरटेन्मेंट’ या प्रॉडक्शन हाऊसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेला फोटो विद्याने रिट्विट केलाय. ‘हर कॉन्टेस्ट मे विनर है,’ असा कॅप्शन या फोटोला देण्यात आलाय.

एका गृहिणीचा रेडिओ जॉकी होईपर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलेला ‘मै कर सकती है’ #MainKarSaktiHai हा हॅशटॅग विशेष लक्ष वेधून घेतोय. या हॅशटॅगचा नेमका काय अर्थ आहे हे जाणून घेण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कारण १४ सप्टेंबर रोजी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध होणार आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नेहा धुपिया, आरजे मलिष्का आणि मानव कौल यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.या चित्रपटाचं  फक्त ४२ दिवसांत याची शूटिंग करण्यात आली. २३ एप्रिलला शूटिंगला सुरुवात झाली आणि जूनमध्ये चित्रपटाचं शूटिंग संपलं.