मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2017 (14:45 IST)

…अक्षय कुमार ‘प्रेगनेंट मॅन’!!!

बॉक्सऑफिसवर शाहरुख, सलमानच्या चित्रपटांना टक्कर देणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’नंतर आणखी वेगवेगळे प्रयोग करण्याच्या विचारात आहे. आपल्या नव्या चित्रपटात ‘पॅडमॅन’च्या भूमिकेत दिसण्यासाठी अक्षय चक्क ‘प्रेगनेंट मॅन’होणार असून एका कॉमेडी शोमध्ये या अवतारात दिसणार आहे.
 
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेज’शोच्या प्रोमोमध्ये अक्षय प्रेगनेंट पुरुषाच्या रूपात गर्भवती महिलेप्रमाणेच वावरताना दिसेल. अक्षय कुमारनं  इंस्टाग्राम अकाऊंटवर या प्रोमोचा व्हिडिओ शेअर केला आहे.
 
अक्षयनं यापूर्वी अनेकदा स्त्री व्यक्तीरेखा साकारल्या असून ‘प्रेंगनेंट मॅन’होण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘स्टार प्लस’वर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये अक्षय कुमारसोबत कॅामेडियन झाकीर खान, मल्लिका दुआ आणि हुसेन दलाल हे सुद्धा दिसणार आहेत.