शनिवार, 13 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2017 (16:52 IST)

अक्कीने व्यक्त केला अमरनाथ हल्ल्याबाबत संताप

akshay kumar
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू आहेत. या हल्ल्याचा अभिनेता अक्षय कुमारनं तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदनीय आहे. रागही आला आहे आणि दुःखही आहे, असे ट्विट करुन खिलाडी अक्कीनं अमरनाथ हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे.