शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2017 (09:20 IST)

अक्षयकुमारवर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी

akshay kumar

अक्षयकुमार आशियातील सर्वांत मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेता अक्षयकुमार सामाजिक विषयाला अनुसरून चित्रपट बनवित आहे. शिवाय त्याच्यातील देशभक्ती तो वेळोवेळी दाखवूनही देत आहे. त्याच्या याच चांगल्या कामाचा परिपाक म्हणून त्याची मुंबई महानगरपालिकेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड केली आहे. 

आता अक्षय महापालिकेच्या साथीने मुंबईतील रस्ते, नाले आणि छोट्या महानगरातील अडचणींविषयी मुंबईकरांना दिलासा देणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या चांगल्या कामांची जनजागृतीही करणार आहे.