सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अमिताभ यांचे ट्विटरवरून एक्झिटचे संकेत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून एक्झिट घेण्याचे संकेत दिले आहेत.याबाबतचं ट्विट स्वत: अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी ट्वीट करुन, याबाबतची माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी या ट्वीटमधून ट्विटर कंपनीवर आरोप केलाय. त्यांनी कंपनीवर आपले फॉलोअर्स कमी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ते नाराज झाल्याचे दिसते आहे. 
 
अमिता बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “ट्विटर...!!!? तुम्ही माझे फॉलोअर्स कमी केले आहेत? हा एक विनोद आहे. त्यामुळे तुमच्या या राईडमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आतापर्यंतच्या प्रवासासाठी सर्वांचा आभारी आहे.” या ट्वीटमध्ये त्यांनी इतर सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मचाही उल्लेख करुन म्हटलंय की, “या विशाल समुद्रात अनेक मासे आहेत, आणि काही त्यातही अतिशय रोमांचक आहेत”.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. पण बुधवारच्या आकडेवारीनंतर अमिताभ बच्चन यांच्याऐवजी शाहरुख खानने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर अमिताभ बच्चन यांची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सध्या शाहरुख खानचे ३ कोटी २९ लाख ३५ हजार ५६२ ट्विटर फॉलोअर्स आहेत. तर अमिताभ बच्चन यांचे ३ कोटी २८ लाख ९९ हजार ७८७ फॉलोअर्स आहेत.