बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अनुष्का आणि विराट यांचे ट्विट यंदाच्या वर्षीचं ‘गोल्डन ट्विट’

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी अत्यंत खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. यंदाच्या वर्षअखेरीस विराट, अनुष्काच्या लग्नाच्या बातमीचे सर्वत्र त्यांच्याविषयीच्याच चर्चांचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळाले.

इटलीमध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर अनुष्का शर्माने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करत विराटसोबत आपण विवाहबंधनात अडकल्याचे जाहीर केले. लग्नातील विधी सुरु असतानाचा एक फोटो पोस्ट करत तिने ही आनंदाची बातमी दिली. तिचे हेच ट्विट यंदाच्या वर्षीचं ‘गोल्डन ट्विट’ ठरले आहे.
 
अनुष्काने तिच्या लग्नाच्या फोटोसह केलेले ते ट्विट यंदाच्या वर्षी सर्वाधिक वेळा रिट्विट केले असून, यंदाच्या वर्षी तेच गोल्डन ट्विट ठरले आहे, असे ट्विटरकरडून सांगण्यात आले.