सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची मते प्रत्येकाला पटतीलच असे नाही. त्यावर मत-मतांतरे होऊ शकतात. ते सगळे व्हायलाही हवे. मात्र, आता चर्चा करण्याऐवजी विरोधकांना गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत, अशी खंत पद्मावत चे दिग्दर्शक संजय लीला भन्सालळी यांनी व्यक्त केली.
 
पद्मावत वरुन झालेल्या रणकंदनाबद्दल बोलताना पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली.