रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'वीरे दी वेडिंग' १ जूनला रिलीज होणार

करिनाच्‍या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्‍यात आली आहे.  आधी हा चित्रपट १८ मे रोजी रिलीज होणार होता. मात्र, आता हा १ जूनला रिलीज होणार आहे. ही माहिती एकता कपूरने ट्‍विरवरुन दिली आहे.  
 
एकता कपूरने ट्‍विटमध्‍ये लिहिले आहे, '१ जून हा मोठा दिवस आहे. कारण लक्ष्‍यच्‍या बर्थडे दिवशी 'वीरे दि वेडिंग' हा चित्रपट रिलीज होणार आहे. बर्थडे आणि लग्‍नाचे आमंत्रण तुम्‍हाला सर्वांना आहे.' 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाचे आतापर्यंत दोन पोस्टर रिलीज करण्यात आले. हे दोन्ही पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
 
 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करत आहे. यात  करिनासह सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना कपूर एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगीची भूमिका साकारणार आहे. एकूणच ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे.