मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

29 वर्षीय मुलाचा दावा ऐश्वर्या राय माझी आई

भलतच प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका युवकाने ऐश्वर्या राय ही त्याची आई असल्याचे त्याने म्हटले आहे.विशाखापट्टनम येथे हा युवक राहतो.  त्याचे नाव संगीत कुमार आहे. त्याचा जन्म  आयईएफमार्फत १९८८ मध्ये लंडनमध्ये  झाला आहे. 
 
त्यानंतर पुढील दोन वर्ष ऐश्वर्याचे पालक वृंदा राय आणि कृष्णाराज राय यांनीच त्याचे पालन- पोषण केले. पुढे संगीतचे वडील आदिवेलू रेड्डी यांनी त्याला विशाखापट्टनम येथे आणले. नंतर तो रेड्डी कुटुंबियांसोबतच राहू लागला आहे. याविषयी संगीत म्हणतो, माझ्या आईने 2007 मध्ये अभिषेकशी लग्न केले आहे . तो म्हणतो की मी मागील 27 वर्ष माझ्या कुटुंबियांपासून दूर राहत आहे. मला आईची फार आठवण येते आहे . यामध्ये ऐश्वर्या अर्थात  आईचा मोबाइल नंबर तरी मिळावा अशी त्याची अपेक्षा आहे. 
 
मात्र ऐश्वर्याचा मुलगा असल्याचा एकही पुरावा त्याच्याकडे नाही आहे. लहान असताना मला नक्की काय करायला हवे ते कळत नसताना माझ्या नातेवाईकांनी सगळे कागदपत्र नष्ट केले आहेत.